महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ


                         सिंचन भवन,बारणे रोड,मंगळवार पेठ,पुणे ४११०११ 
 
                                  दूरध्वनी क्रमांक:०२०-२६११४६१८,२६१३५२६३

मुख्य पान

कृष्णा पाणी तंटा लवादाच्या निर्णयानुसार महाराष्ट्राच्या वाट्यास आलेल्या

पाण्याचा वापर  पूर्णपणे करण्याच्या दृष्टीने, प्रकल्पांच्या कामांना चालना

देण्यासाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची निर्मिती सन १९९६

मध्ये करण्यात आली. त्यावेळी ३५ मोठे, ७३ मध्यम व ८१८ लघुबंधारे

आणि एकूण ९२६ प्रकल्पांतर्गत ५८५ अब्ज घनफूट (१६५६७ दलघमी)

पाणी प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते.त्यातील पूर्ण

झालेले प्रकल्प वगळता उर्वरित  २७ मोठे,३९ मघ्यम व ३५५ लघु

पाटबंधारे असे एकूण ४११ प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाच्या

स्थापनेच्या  वेळी महामंडळासमोर होते. सद्य:स्थितीत एकूण ५६० अब्ज

घनफूटपाणीसाठा करणे व २५ अब्ज घनफूट पुर्नउद्भवातून  असा एकूण

५८५ अब्ज घनफूट पाणीवापर हे महामंडळाचे उद्दिष्ट आहे.

आंघ्र प्रदेशने जर गोदावरी खोर्‍यातील पाणी कृष्णा खोर्‍यात पोलावरम

प्रकल्पाद्वारे वळविले तरआणखी १४ अब्ज  घनफूट पाणीसाठा राज्यास

मिळणे अपेक्षित आहे.महामंडळाचे कार्यक्षेत्र पुणे, सोलापूर, कोल्हापूर,

सांगली, सातारा या जिल्ह्यात पूर्णपणे आहे. तसेच अहमदनगर, उस्मानाबाद

व बीड या जिल्ह्यात ते अंशत: विभागले गेले आहे.